
जलसंपदा विभाग
महाराष्ट्र शासन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार

ठळक बातम्या
२४ एप्रिल २०२५
मार्गदर्शक सूचना अद्ययावत
नवीन मूल्यमापन निकष आणि अर्ज सादर करण्याच्या अटी प्रकाशित करण्यात आल्या आहेत.
१ जुलै २०२६
अर्ज पोर्टल सुरू
पोर्टल वर अर्ज स्वीकारण्यास सुरुवात.
२५ ऑगस्ट २०२६
पाणी वापर संस्थांना दि. ३०/०९/२०२६ पर्यंत आवेदन भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
पाणी वापर संस्थांना आवेदन भरण्यास १ महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
ज्ञान केंद्र
फोटो गॅलरी
निकाल
संक्षिप्त माहिती
महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्याअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धेसाठी सुधारीत समिती रचना, मार्गदर्शक सूचना व कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी दि.२४/०४/२०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार हि योजना सलग ५ वर्ष राबविण्यात येणार आहे.
स्पर्धेचा आढावा
महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्याअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा' याची सुरुवात सन २००९ पासून करण्यात आली आहे. महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा- २००५ च्या तरतुदींनुसार सिंचन व्यवस्थापनात शेतकऱ्यांचा सहभाग वाढवणे, पाणी वापर संस्थांचे (Water User Associations - WUAs) व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होणे आणि त्यांनी स्वबळावर आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे, यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे हे या अभियानाचे मूळ उद्दिष्ट आहे.
पुरस्कार प्रक्रियेचे वेळापत्रक
| कालावधी | स्तर | टप्पा |
|---|---|---|
| एप्रिल | शासन | स्पर्धेची घोषणा व शासन निर्णय प्रसिद्ध करणे |
| मे-जून | मंडळस्तरीय कृती समिती | जनजागृती अभियान व जाहिरात टप्पे (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी १३ मे) |
| जुलै-ऑगस्ट | ई-प्रशासन मंडळ, पुणे | महामंडळनिहाय ऑनलाइन नामांकने मागविणे व मंडळस्तरीय कृती समितीस अहवाल सादर करणे. (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी १३ ऑगस्ट) |
| सप्टेंबर- ऑक्टोबर | मंडळस्तरीय कृती समिती | प्राप्त नामांकनांची प्राथमिक छाननी व कागदपत्रे तपासणी, क्षेत्रीय पाहणी करून अहवाल महामंडळ स्तरीय छाननी समितीस सादर करणे |
| नोव्हेंबर | महामंडळस्तरीय छाननी समिती | पाणी वापर संस्थांची मुलाखत व उर्वरित 30 गुणांचे मूल्यांकन करून पुरस्कारासाठी पाणी वापर संस्थांची शिफारस राज्यस्तरीय समितीने करणे |
| डिसेंबर | राज्यस्तरीय छाननी समिती | बैठकीद्वारे 20 गुणांचे मूल्यांकन करणे व शासनास पुरस्कारासाठी पाणी वापर संस्थांची नावे प्रस्तावित करणे |
| जानेवारी | शासन | राज्यस्तर व महामंडळस्तरीय निकाल घोषित करण्यासाठी शासन निर्णय प्रसिद्ध करणे |
| फेब्रुवारी | शासन | पारितोषिक वितरण समारंभ |